Thursday, October 28, 2010

अंजानी राहो में तू क्या धूंडता फिरे..?
"अंजाना- अंजानी.." (Film Review)


फिल्म पाहिल्यावर अक्षरशः संताप आला...
अत्यंत भिक्कार दिग्दर्शन आणि पटकथा असणारा हा टुक्कार सिनेमा आहे..प्रियांका रणबीर ची म्हणे केमिस्ट्री..? अहो हे दोघे शेवटपर्यंत "अंजाने" असल्यासारखेच वावरतात, आणि शेवटी तर त्यांना बळेच प्रेमात पाडले आहे. प्रियांकाने काही ठिकाणी चांगला अभिनय केलाय, पण ह्यात कंटिन्युटी नसल्याने प्रभाव पडत नाही. लास वेगास, वाळवंटातील लघुशंकेचा प्रसंग म्हणजे थिल्लरपणाचा कळस आहे..वेगहीन हाताळणी फिल्म आणखी बोरिंग-रटाळ बनवते.. केवळ लोकेशन्स, उत्तम कोस्च्युम्स, विदेशी शहरं हे एव्हढच पाहण्यास सामान्य प्रेक्षक २०० रुपये माणशी खर्चून फिल्म पाहायला जातो का? अभिनयाचा दर्जा बरा असला तरी, मुळात कथेतच दम नाही... एक तर कथा- पटकथा किंव्वा मग साध्या कथेचाही उत्तम डोलारा उभा करू शकणारा प्रतिभावान दिग्दर्शक यांपैकी काहीतरी एक सिनेमा तारून नेतो (याचे उत्तम उदा म्हणजे सुरज बडजात्या आणि हम आपके ही कौन..! दोन ओळींची कथावस्तू, पण अत्यंत खुबीने त्याने हा सिनेमा पुन्हा पुन्हा पहावा असा केलाय..) आणि कधी कधी गाणी. या फिल्म मध्ये वरील तीनही गोष्टींचा अभाव आहे. फुक्कट दाखवला तरी पाहू नये, एकूण आपण यापासून अंजाने बनून राहण्यातच शहाणपण आहे असे मला प्रामाणिकपणे वाटते....

No comments:

Post a Comment